जळगाव: पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना. 21 व्या शतकात पैशाच्या पावसासाठी एका महिलेला जीवंत जाळण्यात आलं. हा धक्कादायक प्रकार महाराष्ट्रातील जळगावात घडला आहे. या प्रकरणानंतर संपूर्ण गाव हादरलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जळगावात पैशाच्या पावसासाठी एका महिलेला जिवंत जाळण्यात आलं आहे. माया दिलीप फरसे असं मृत महिलेचं नाव आहे.  त्या शिवाजी नगरमध्ये राहात होत्या. याप्रकरणी पोलिसांनी संतोष मुळीक या मांत्रिकासह मृत महिलेच्या भाच्याला अटक केली आहे. 



महिलेला जीवंत जाळल्यानंतर दोघांनी तिचा मृतदेह तापी नदी पात्रात पुरुन ठेवला होता. मृत महिला 15 डिसेंबरला घरात कुणालाही न सांगता बेपत्ता झाली होती. त्यानतंर सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी दोघांना ताब्यत घेतलं.. त्यांची चौकशी केली असता त्यांनी गुन्हा कबूल केला.  त्यानंतर पोलिसांनी मृत महिलेचा मृतदेह नदी पात्रातून बाहेर काढला. 


आजही या 21 व्या शतकात पैशाचा पावसाचा विचार केला जातो हीच बाब धक्कदायक आहे. तसेच या प्रकरणात प्रमुख आरोपी हा महिलेचा भाचा आहे. म्हणजे नात्यातील प्रेम, आदर कमी झाला की काय? असा सवाल आता विचारला जात आहे.